राजनीती

चिखली प्रभाग १ मध्ये ‘ऑटोरिक्षावाला वकील’ चा झंझावात!

चिखली प्रभाग १ मध्ये ‘ऑटोरिक्षावाला वकील’ चा झंझावात!
क़ासीद / चिखली : दि. २६ नोव्हेंबर २०२५ चिखली नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष उमेदवार म्हणून अॅडव्होकेट जावेद चौधरी यांनी ‘ऑटोरिक्षा’ हे निवडणूक चिन्ह घेऊन प्रचाराला सुरवात केली आहे. अवघ्या काही तासातच त्यांनी प्रभागातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चाळ, प्रत्येक दुकान आणि चौकापर्यंत पोहोचून मतदारांमध्ये कमालीची उत्साहाची लाट निर्माण केली आहे.
जावेद चौधरी यांचा राजकीय वारसा जुना आहे. जावेद यांनी तरुणाईच्या उंबरठ्यावरुनच राजकारणात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थी संघटना, तरुण संघटना, सामाजिक कार्य, धरणे आंदोलने, उपोषणे, अगदी पोलिस स्टेशन ते न्यायालयापर्यंत जनतेच्या प्रश्नांसाठी लढादिला.
“आमचा जावेद भाई कोर्टात आमची केस लढतो आणि रस्त्यावरही आमची लढाई लढतो,” असे प्रभागातील नागरिक अभिमानाने सांगत आहेत. कायद्याची जाण आणि जनतेचा विश्वास वकिली व्यवसायात यशस्वी असलेले अॅड. जावेद चौधरी यांनी गरीब व गरजू लोकांच्या केसेस लढून दिल्या आहेत. नगरपरिषदेत जर आपला वकील गेला तर आपल्या हक्कासाठी कोर्टात जाण्याची वेळच येणार नाही, ही भावना प्रभागात जोर धरू लागली आहे.
अपक्ष असुन मी माझ्या प्रभागातील लोकांसाठी लढतोय. मला पक्षाची गरज नाही, मला माझ्या जनतेची साथ हवी आहे, असे ते ठामपणे सांगतात. आणि हीच भावना मतदारांना भोवली आहे.
त्यांच्यासोबत तरुण कार्यकर्ते, महिला बचत गट, रिक्षाचालक मोठ्या संख्येने प्रचारात उतरले आहेत. “ऑटो फिरते तिथे जावेद भाईंची चर्चा असते,” असे चित्र प्रभाग १ मध्ये दिसते.
“ यावेळी प्रभाग १ मधून अपक्ष उमेदवारच जिंकणार, आणि तो जावेद भाईच असणार, ” अशी चर्चा प्रभागात सर्वत्र रंगली आहे. पक्षाच्या चिन्हाशिवाय, मोठ्या पैशाशिवाय, फक्त जनतेच्या साथीवर लढणारा हा ‘ऑटोरिक्षावाला वकील’ चिखलीच्या राजकारणात नवा इतिहास रचणार का, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण सध्या तरी प्रभाग १ मध्ये ‘ऑटोरिक्षा’चाच बोलबाला दिसत आहे.